मुंबई - मूडीजने भारताचे पतमानांकन कमी केल्याने शेअर बाजारात गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजाराचा निर्देशांक ३३० अंशाने घसरून ४०,३२३.६१ वर स्थिरावला. सार्वजनिक कंपनी गेल, भारत फोर्ज, अलाहाबाद बँकेच्या मूडीजने देशाचे पतमानांकन केल्याचा फटका शेअर बाजारावर बसला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक हा १०३.६५ अंशाने घसरून ११,९०५.७० वर स्थिरावला.
हेही वाचा-नोटाबंदीचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे मंदी ; ३३ टक्के लोकांचे मत
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
शेअर बाजार निर्देशांक अस्थिर राहिला असताना केवळ सहा कंपन्यांचे शेअर वधारले. येस बँकेचे शेअर ४.६६ टक्क्यांनी वधारले. इंडुसइंड बँकेचे शेअर हे २.९८ टक्क्यांनी वधारले. तर आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेकचे शेअर हे २ टक्क्यांनी वधारले आहेत.
सन फार्मा, वेदांत, ओएनजीसी, टीसीएस आणि हिंदुस्थान लिव्हरचे शेअर हे २ ते ५ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा-एसबीआयकडून ठेवीवरील व्याजदरात मोठी कपात; कर्जाचे दर अंशत: स्वस्त