ETV Bharat / business

मारुती सुझुकीचे २.१९ टक्क्यांनी वधारले शेअर; व्होडाफोन आयडियाला ५. ६ टक्क्यांचा फटका

गेल्या नऊ महिन्यात मागणी घटल्याने मारुती सुझुकीच्या वाहनांची विक्री कमी झाली आहे. अशा स्थितीत मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये वाहनांचे उत्पादन ४.३३ टक्क्यांनी वाढविले.

vodafone idea & Maruti Share price
संपादित - व्होडाफोन आणि मारुतीचे शेअर
author img

By

Published : Dec 9, 2019, 2:30 PM IST

नवी दिल्ली - मारुती सुझुकी इंडियाचे शेअर आज २.१९ टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीने नोव्हेंबरमध्ये उत्पादन वाढिल्याने मारुतीच्या शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केली.

मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकीचे शेअर २.१९ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे प्रति शेअरची ७ हजार ३२ रुपये ९० पैसे एवढी किंमत झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मारुती सुझुकीचे शेअर हे १.९९ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे प्रति शेअरची किंमत ही ७ हजार २४ रुपये ५ पैसे झाली.

हेही वाचा-'सरकारने दिलासा दिला नाही तर व्होडाफोन-आयडिया होईल बंद'

गेल्या नऊ महिन्यात मागणी घटल्याने मारुती सुझुकीच्या वाहनांची विक्री कमी झाली होती. अशा स्थितीत मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये वाहनांचे उत्पादन ४.३३ टक्क्यांनी वाढविले. कंपनीने नोव्हेंबरमध्ये एकूण १ लाख ४१ हजार ८३४ वाहनांचे उत्पादन केले. तर गतवर्षी कंपनीने १ लाख ३५ हजार ९४६ वाहनांचे उत्पादन घेतले. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

हेही वाचा-अर्थसंकल्प तयार करणाऱ्या गटातील दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त

व्होडाफोनच्या शेअरमध्ये ५.६४ टक्क्यांची घसरण
सरकारने दिलासा दिला नाही तर व्होडाफोन आयडिया बंद करावी लागेल, असे व्होडाफोन कंपनीचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी ६ डिसेंबरला म्हटले होते. सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर कंपनीपुढे नादारीच्या (इन्सॉलव्हन्सी) मार्गाचा पर्याय असल्याचे बिर्ला यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडियाला कोट्यवधी रुपये दूरसंचार विभागाला द्यावे लागणार आहेत. शेअर बाजारात सकाळी ११ वाजून १० मिनिटाला व्होडाफोनच्या प्रति शेअरची ६ रुपये ५३ पैसे किंमत होती. तर शुक्रवारी व्होडाफोन आयडियाच्या प्रति शेअरची ७.३१ रुपये किंमत होती.

हेही वाचा-नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला

Intro:Body:

New Delhi: Shares of Maruti Suzuki India on Monday rose over two per cent after the automaker reported increase in total production for November.

The MSI stock was trading 2.19 per cent up to Rs 7,032.90 on the BSE.

On the NSE, the scrip gained 1.99 per cent to Rs 7,024.05.

Maruti Suzuki India (MSI) increased its production in November by 4.33 per cent, after having reduced output for nine straight months due to lower demand.

The company produced a total of 1,41,834 units in the month as against 1,35,946 units in the year-ago period, MSI said in a regulatory filing on Friday.

The share price of telecom major Vodafone Idea fell by 5.64 per cent intraday on Monday after its Chairman Kumar Mangalam Birla said the company may have to stop operations if it does not receive any relief from the government following the Supreme Court order to pay dues of Rs 92,000 crore related to the adjusted gross revenue (AGR) issue.

At 11:10 am, the stock was trading at Rs 6.53 per share against the previous close of Rs 7.31.

"We will have to shut shop," said Birla at the Hindustan Times Leadership Summit over the weekend when asked about the future course of action in the absence of government relief.

Last month, Vodafone Idea and competitor Bharti Airtel had said that their ability to operate and make profits will depend on relief from the government after the Supreme Court upheld a demand by the Department of Telecommunications that mobile operators pay overdue levies and interest.

Birla said the company will have to opt for the insolvency route in the absence of relief.

Vodafone Idea had reported a record loss of Rs 50,921 crore for the July to September quarter (Q2 FY20) after making a provision for the apex court's ruling on payment of AGR dues.

The company's revenue from operations during the quarter plunged to Rs 10,844 crore from Rs 22,114 crore year-on-year.

Vodafone Idea hiked tariffs for its pre-paid plans effective from December 3, a first in past four years, under which call and data charges will cost more by up to 42 per cent.

It will also charge 6 paise per minute for every outgoing call made by customers on to the network of other operators.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.