मुंबई- शेअर बाजार निर्देशांकात दिवसभर चढ-उतार सुरू राहिला. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १२.७८ अंशाने वधारून ५१,५४४.३० वर स्थिरावला. आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत.
निफ्टीचा निर्देशांक १० अंशाने घसरून १५,१६३.३० वर स्थिरावला.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ६६१ रुपयांची घसरण
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
आयसीआयसीआय बँकेचे शेअर सर्वाधिक सुमारे २ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँक, इन्फोसिस, एचडीएफसी ट्विन्स, बजाज फिनसर्व्ह आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर वधारले. तर दुसरीकडे आयटीसी, ओएनजीसी, सन फार्मा, भारती एअरटेल आणि टायटनचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीकडून २० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा
सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक वधारला होता, असे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य बाजार रणनीतीतज्ज्ञ आनंद जेम्स यांनी सांगितले. तर दुसऱ्या सत्रात निर्देशांक घसरल्याचे जेम्स यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.७२ टक्क्यांनी घसरून ६०.७० डॉलर आहेत.