ETV Bharat / business

MUMBAI SHARE MARKET शेअर बाजारात 1170 अंशांची घसरण, रिलायन्सच्या शेअरला 4 टक्क्यांहून अधिक फटका - मुंबई शेअर बाजार निर्देशांक

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, टायटन आणि एसबीआयचे शेअर सुमारे 5.74 टक्क्यांपर्यत घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 4 टक्क्यांहून अधिक घसरले. रिलायन्सने तेलशुद्धीकरण कंपनीमधील 20 टक्के हिस्सा सौदी अॅराम्कोला विकण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला. हा 15 अब्ज डॉलरचा सौदा होता.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Nov 22, 2021, 8:49 PM IST

मुंबई - काही दिवसापूर्वीच वधारलेला शेअर बाजार जोरदार आपटला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरवातीला शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला. बाजार बंद होईपर्यंत मुंबई शेअर बाजार निर्देशांकमध्ये 1,170 अंशांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 350 अंशांचीची घसरण झाली. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 58,465 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक 17,416 अंशावर बंद झाला.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी जगभरातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली (Share market update) होती. त्याचा फटकादेखील भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. शेअर बाजारातील जवळपास सर्वच क्षेत्रात घसरण दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, अर्थ सेवा आणि एफएमसीजीसारख्या क्षेत्रात मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतात पैसा गुंतवणे अधिक फायदेशीर ठरणार नाही. त्याचा नकारात्मक परिणाम आज शेअर बाजारामध्ये दिसून आला.

हेही वाचा-धक्कादायक : रक्षकच झाला भक्षक; महाविद्यालयीन तरुणावर पोलीस कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक अत्याचार

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

एकीकडे शेअर बाजार घसरला असताना बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एसबीआय आणि टायटनचे समभागही तोट्यात गेले. दुसरीकडे, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पॉवरग्रीड आणि इंडसइंड बँक या शेअर्समध्ये वाढ झाली. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, टायटन आणि एसबीआयचे शेअर सुमारे 5.74 टक्क्यांपर्यत घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर (reliance industries share price) 4 टक्क्यांहून अधिक घसरले. रिलायन्सने तेलशुद्धीकरण कंपनीमधील 20 टक्के हिस्सा सौदी अॅराम्कोला विकण्याचा (reliance deal with Saudi Aramco) निर्णय प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला. हा 15 अब्ज डॉलरचा सौदा होता. दुसरीकडे भारती एअरटेल, एशियन पेंट्स, आणि पॉवरग्रीड कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

पेटीएमची पालक कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचे शेअर 13 टक्क्यांहून घसरले आहेत. तर क्षेत्रनिहाय निर्देशांकात रिअल्टी, उर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑटो, तेल आणि गॅस, फायनान्सचे शेअर 4.45 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तर दूरसंचार, धातू या क्षेत्रातील कंपन्यांचे निर्देशांक वधारले आहेत.

हेही वाचा-ST संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव; गुणरत्न सदावर्तेंचा मुंबई उच्च न्यायालयात दावा

या कारणाने घसरला शेअर बाजार निर्देशांक

जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख ( Geojit Financial Services) संशोधक विनोद नायर म्हणाले, की पेटीएम ही देशातील सर्वात नवीन आणि मोठी फिनटेक कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचा शेअर बाजारात नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे किरकोळ श्रेणीमधून होणाऱ्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हेच गुंतवणूकदार वर्षभरात महत्त्वाचे ठरले आहेत.

हेही वाचा-ज्ञानदेव वानखेडेंनी दाखल केलेली मानहानीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; न्यायालय म्हणाले, नवाब मलिकांनी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.