ETV Bharat / business

Gold किमतीत चढ-उतार सुरू; जाणून घ्या, गुंतवणुकीची योग्य वेळ - सोने गुंतवणूक सल्ला

बहुतांश गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये कधी गुंतवणूक करायची याची नेमकी माहिती नसते. ही शंका दूर करण्यासाठी ईटीव्ही भारतने बाजाराचे तज्ज्ञ सतीश कनथेटी यांच्याशी संवाद साधला. त्याविषयी संक्षिप्त माहिती जाणून घ्या.

gold rate
सोने दर
author img

By

Published : Jun 21, 2021, 7:58 PM IST

हैदराबाद - अनेक शतकांपासून भारतीय लोक हे सोन्यामधील गुंतवणुकीला प्राधान्य देत आले आहे. शेअर बाजार, म्यूच्युअल फंड व स्थावर मालमत्ता आदी गुंतवणुकीचे पर्याय असले तरी सोन्यांमधील गुंतवणूक हे नेहमीच वाढलेली आहे. विशेषत: अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला असताना ही गुंतवणूक वाढलेली आहे.

सध्या, आर्थिक संकट असतानाही गुंतवणूकदारांनी सोन्यामधील गुंतवणुकीला पसंती दिली आहे. असे असली तरी बहुतांश गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये कधी गुंतवणूक करायची याची नेमकी माहिती नसते. ही शंका दूर करण्यासाठी ईटीव्ही भारतने बाजाराचे तज्ज्ञ सतीश कनथेटी यांच्याशी संवाद साधला. त्याविषयी संक्षिप्त माहिती जाणून घ्या.

हेही वाचा-फेसबुकसह व्हॉट्सअपची चौकशी प्रकरण: दिल्ली उच्च न्यायालयाकडून निकाल राखीव

सोन्याच्या किमती कशा ठरतात?

झेन सिक्युरिटीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य आणि सोन्याची किंमत यांचे व्यस्त प्रमाण असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जसे डॉलरचा दर वधारतो, तसे सोन्याच्या किमती घसरतात. तर डॉलरचे मूल्य घसरल्यानंतर सोन्याच्या किमती वाढायला लागतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने काही संकेत दिल्यानंतर अलीकडे सोन्याच्या किमती घसरल्याचे कानथेटी यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.

हेही वाचा-मारुती सुझुकीकडून वाहनांच्या किमतीत वर्षभरातच तिसऱ्यांदा होणार दरवाढ

या कारणाने सोन्याच्या दरात झाली घसरण-

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने (फेडरल रिझर्व्ह बँक) येत्या काही महिन्यांत व्याजाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची मागणी वाढली. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला. नुकतेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे सुमारे १०० पैशांनी घसरले आहे. ८ जूनला रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत ७२.२९ रुपये होते. हे प्रमाण कमी होऊन १८ जूनला रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत ७३.२६ रुपये झाले आहे. रुपयाचे मूल्य घसरत असताना किंवा डॉलरचे मूल्य वधारत असताना सोन्याचे दर घसरले आहेत.

हेही वाचा-सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

खरेदी करण्यासाठी टिप्स?

सतिश यांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोन्याचे दर अल्प काळासाठी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, डॉलरचे मूल्य हे वाढत आहे. ज्यांना दीर्घकालीन मुदतीकरिता गुंतवणूक करण्याची आहे, त्यांनी सोन्याचे दर घसरत असताना गुंतवणूक करण्यास सुरुवात करायला हवी. ज्यांना पुरेशी गुंतवणूक करायची आहे, ते सोन्याचे दर आणखी कमी होण्याकरिता वाट पाहू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.