ETV Bharat / business

महागाईचे संकट: एलपीजीसह पेट्रोल-डिझेलचे दर पुढील आठवड्यात वाढण्याची शक्यता

author img

By

Published : Oct 27, 2021, 7:28 PM IST

केंद्र सरकारने गतवर्षी एलपीजीवरील अनुदान हटवून एलपीजीच्या किमती बाजाराएवढ्या आणल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे केंद्र सरकारने एलपीजी दरावरील नियंत्रण सोडलेले नाही. मात्र, सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजीचे दर वाढवावे लागणार असल्याचे सूत्राने सांगितले.

गॅस सिलिंडर दर
गॅस सिलिंडर दर

नवी दिल्ली - स्वयंपाकघरातील एलपीजी गॅस पुन्हा पुढील आठवड्यात महागण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले. जर केंद्र सरकारकडून या दरवाढीला परवानगी मिळाली तर एलपीजी गॅसची ही पाचवी दरवाढ असणार आहे.

गॅस सिलिंडरचे दर 6 ऑक्टोबरला 15 रुपयांनी वाढले. जुलै ते ऑक्टोबरपर्यंत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत एकूण 90 रुपयांनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम उत्पादनांचे दर वाढत असल्याने सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांना प्रति सिलिंडर 100 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर सौदी अरेबियात उत्पादन होणाऱ्या एलपीजीचे दर हे ऑक्टोबरमध्ये 60 टक्क्यांनी वाढून प्रति टन 800 डॉलरवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही ब्रेंट क्रूडचे दर हे प्रति बॅरल 85.42 डॉलरवर आहेत.

सरकारचे एलपीजीच्या दरावर नियंत्रण-

एलपीजीचे दर हे सरकारकडून नियंत्रणात आहेत. तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या किरकोळ विक्रीतील किमतीवर नियंत्रण ठेवू शकते. केंद्र सरकारने गतवर्षी एलपीजीवरील अनुदान हटवून एलपीजीच्या किमती बाजाराएवढ्या आणल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलप्रमाणे केंद्र सरकारने एलपीजी दरावरील नियंत्रण सोडलेले नाही. मात्र, सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजीचे दर वाढवावे लागणार असल्याचे सूत्राने सांगितले.

हेही वाचा-राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक

दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. तर कोलकात्यात गॅस सिलिंडरची किंमत 926 रुपये आहेत. हे दर घरगुती गॅस सिलिंडरचे आहेत. घरगुती वापरासाठी 14.2 किलोचे 12 गॅस सिलिंडरला परवानगी आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात अंशत: वाढ; चांदी प्रति किलो 323 रुपयांनी महाग

इंधनाच्या दरात वाढ सुरुच

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा बुधवारी प्रत्येकी 35 पैशांनी वाढल्या आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 107.94 रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 113.80 रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 तर मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 104.75 रुपये आहे.

देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहे. 28 सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर हे 22 वेळा वाढविण्यात आले आहे. या दरवाढीने पेट्रोलची किंमत 6.75 रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलचे दर हे 24 सप्टेंबरपासून 24 वेळा वाढविले आहेत. या दरवाढीमुळे डिझेल हे 8.05 रुपयांनी वाढले आहे. त्यापूर्वी 4 मे ते 17 जुलै दरम्यान पेट्रोलचे दर हे 11.44 रुपयांनी वाढले आहेत. तर याच कालावधीत डिझेलचे दर हे प्रति लिटर 9.14 रुपयांनी वाढले आहेत.

हेही वाचा-Paytm आणणार 16,600 कोटींचा IPO, गुंतवणूकदारांसाठी यंदाच्या दिवाळीमध्ये मोठी संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.