ETV Bharat / business

Gold Investment : डिजिटल सोने हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ? वाचा तज्ञांचा सल्ला.. - गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा

प्रत्येक माणसाला केलेल्या गुंतवणूकीवर जास्तीचा परतावा (Higher Return Investments) कसा मिळेल अशी इच्छा असते. सध्या डिजीटल सोने (Digital Gold) हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. तसेच यात गुंतवणूक कशी करावी, परतावा याबद्दल जाणून घ्या तज्ञांकडून (Expert Advice) ..

Gold Investment
Gold Investment
author img

By

Published : Jan 6, 2022, 12:46 PM IST

हैदराबाद : ज्यांचे उत्पन्न चांगले आहे, तसेच ज्यांना पैसे दुप्पट करायचे आहेत. परंतु, अनेक जण चांगला परतावा मिळवण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी या संभ्रमात असतात. भारतीय सोन्याचे शौकीन आहे आणि ते नेहमी सोन्यात चांगल्या गुंतवणुकीच्या (Good investment in Gold) शोधात असतात. शिवाय, प्रत्येकाला त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळावा (Higher Return Investments) अशी इच्छा असते. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात? धोकादायक प्रकारच्या गुंतवणुकीत हे शक्य आहे का ? यावर तज्ञ (Expert Advice) काय म्हणतात ते पाहूया.

मी दरमहा 10,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. किमान वार्षिक परतावा 14 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कोणत्या योजना निवडल्या पाहिजेत? मी किती काळ गुंतवणूक करावी ? असे अरुणने विचारले.

"उच्च परतावा फक्त जोखमीच्या गुंतवणुकीतच शक्य आहे. तुम्ही किती जोखीम सहन करू शकता ते पहा. इक्विटी-आधारित गुंतवणुकीसह, काही प्रकरणांमध्ये परतावा 14 टक्क्यांपेक्षा जास्त असतो. जेव्हा गुंतवणूक किमान 7 -10 वर्षे पर्यंत चालू राहते, तेव्हाच शक्य आहे. अल्पकालीन चढउतार जास्त आहेत. वेळेवर गुंतवणूक करत राहिल्यास तुम्ही दीर्घकाळात १२-१५ टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा करू शकता. यासाठी तुम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे वैविध्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड पहावे,” असा सल्ला तुम्मा बलराज देतात.

"मला माझ्या आईच्या नावावर असलेल्या ज्येष्ठ नागरिक बचत खात्यात 5 लाख रुपये जमा करायचे आहेत. हे अधिक फायदेशीर आहे का? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आणि दरमहा ठराविक रक्कम घेणे चांगले होईल का?" असे स्वप्ना विचारते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळू शकते. दर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते. सध्याच्या परिस्थितीत, मुदत ठेवी आणि कर्ज निधी जास्त परतावा देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा करा. ही योजना पाच वर्षे सुरू ठेवावी. कलम ८०सी अंतर्गत ही गुंतवणूक करसवलत आहे. मिळविलेले व्याज एकूण उत्पन्नासह दर्शविले जाते आणि लागू स्लॅबवर आधारित करपात्र आहे.

"मी 43 वर्षांचा आहे. मला 75 लाख रुपयांची टर्म पॉलिसी घ्यायची आहे. ती एकाच विमा कंपनीकडून घेता येईल का? दोन कंपन्यांकडून घेतल्यास त्याचा काय फायदा होईल ?" असे श्रीकांत विचारतो.

जीवन विमा पॉलिसीचे मूल्य नेहमी वार्षिक उत्पन्नाच्या 10-12 पट असावे. विमा घेताना तुमचे वैयक्तिक, आरोग्य आणि आर्थिक तपशील स्पष्टपणे नमूद केले पाहिजेत. केवळ चांगला दावा पेमेंट इतिहास असलेल्या कंपन्यांचीच विम्यासाठी निवड करावी. जर विमा एकाच कंपनीने घेतला असेल आणि कंपनीने कोणत्याही समस्येमुळे विमा दावा नाकारल्यास आम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे, दोन विमा कंपन्यांकडून पॉलिसी घेणे चांगले आहे जर एकाने नाकारले तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू शकतो.

आता अनेक कंपन्या डिजिटल 'गोल्ड'च्या नावाखाली सोन्यात गुंतवणुकीची संधी देत ​​आहेत! हे निवडणे चांगले आहे का? धोका आहे का ? असे वेंकट म्हणतो.

सोन्यात गुंतवणूक करण्याचे आता अनेक मार्ग आहेत. डिजिटल गोल्ड हे त्यापैकी एक आहे. हे आकर्षक दिसत आहे कारण तुम्ही यामध्ये 100 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सोन्याच्या किमतीवर अवलंबून नफा किंवा तोटा करणे शक्य आहे. कारण, त्यात वेळोवेळी चढ-उतार होत असतात. तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असल्यास गोल्ड ईटीएफ किंवा फंड्सचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला जातो, असे मत तुम्मा बलराज यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - ATM Service Charges : बँकेच्या एटीएम शुल्कात आजपासून होणार वाढ, जाणून घ्या, सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.