नवी दिल्ली - भारतीय विमा नियामक मंडळाने (आयआरडीएआय) मंगळवारी वैद्यकीय उपचारांवर सवलत देऊन आरोग्य योजना विकल्याचा दावा करणाऱ्या अनधिकृत संस्थांविरूद्ध लोकांना सतर्क केले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटले की, असे लक्षात आले आहे की काही अनधिकृत संस्था वैद्यकीय उपचारांवर किंवा रोगनिदानविषयक चाचण्यांवर सूट देत आहेत. तसेच आरोग्य योजनांची विक्री करीत असल्याचा दावा करीत आहेत.
एका सार्वजनिक नोटीसमध्ये नियामकाने म्हटले आहे की, केवळ आयआरडीएआय-नोंदणीकृत विमा कंपन्या किंवा त्यांचे अधिकृत एजंट आणि मध्यस्थ विमा उत्पादने विकू शकतात. अशी सेवा जे अनधिकृत व्यक्तींकडून किंवा संस्थांकडून घेतात त्यांच्या स्वत: च्या जोखमीवर असे करणे आवश्यक आहे, असेही नियामक मंडळाने म्हटले आहे.
आयआरडीएआयद्वारे मान्यता प्राप्त विमा कंपन्याची यादी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, शंका असल्यास ग्राहकांनी विमा योजनेची व विक्रेत्याची सत्यता शोधण्यासाठी विमा कंपनीशी संपर्क साधावा. यापूर्वी, नियामकाने आयआरडीएआयचे अधिकारी किंवा प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अज्ञात आणि बेईमान व्यक्तींच्या कॉलबद्दल लोकांना सतर्क केले होते. जे विमा पॉलिसीच्या आवाक्याबाहेरचे आहेत, असे आश्वासने दिली होती.
पॉलिसी खरेदी करताना किंवा पडताळणीसाठी विमा कंपन्यांशी कोणतेही आर्थिक व्यवहार केल्यास जनतेने विमा कंपन्या किंवा नोंदणीकृत मध्यस्थ / विमा एजंटांशी थेट व्यवहार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.