नवी दिल्ली- सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ८ लाख कोटींची घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांकात पाच सत्रात २,०६२.९९ अंशाने घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८५.१० अंशाने घसरून ४९,२१६.५२ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ८,०४,२१६.७१ कोटी रुपयांवरून २,०१,२२,४३६.७५ कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचा-आरोग्य विमा योजनेमध्ये बदल करू नये, आयआरडीएआयचे विमा कंपन्यांना आदेश
एचसीएल टेकचे सर्वाधिक ३.९७ टक्क्यापर्यंत शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, टीसीएस, टेक महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. तर आयटीसी, बजाज, ऑटो, एम अँड एम, मारुती आणि भारती एअरटेलचे शेअर ३.२५ टक्क्यांपर्यंत वधारले आहेत.
हेही वाचा-आयटी कंपनी वुरम ४०० जणांना देणार नोकऱ्या
कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने गुंतवणुकदारांची वाढली चिंता-
देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने कॉर्पोरेट क्षेत्राच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम होण्याची भीती आहे. पुन्हा टाळेबंदी लागू होईल, अशी गुंतवणुकदारांना चिंता वाटत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून २०२३ पर्यंत व्याजदर जवळपास शून्य टक्के राहिल, अशी गुंतवणुकदारांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४० टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६७.७३ डॉलर आहेत.