ETV Bharat / business

शेअर बाजारातील फटका; गुंतवणूकदारांनी गमाविले ३ लाख कोटी रुपये

author img

By

Published : Jan 6, 2020, 7:27 PM IST

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांनी सुमारे ३  लाख ३६ हजार ५५९.८२ कोटी ते १ कोटी ५३ लाख ९० हजार ३१२.६० कोटी रुपये गमाविले आहेत. अमेरिका-इराणमधील भू-राजकीय  तणाव वाढत असल्याने भांडवली बाजारात घसरण होत आहे.

Investors wealth
गुंतवणूकदारांचा पैसा

नवी दिल्ली - गेली दोन दिवस देशातील भांडवली बाजाराला फटका बसत असल्याने गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गुंतवणूकदारांनी दोनच दिवसात ३ लाख कोटी रुपये गमाविले आहेत. इराण-अमेरिकेतील वादामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाल्याने शेअर बाजारात पडझड झाली आहे.

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांनी सुमारे ३ लाख ३६ हजार ५५९.८२ कोटी ते १ कोटी ५३ लाख ९० हजार ३१२.६० कोटी रुपये गमाविले आहेत. अमेरिका-इराणमधील भू-राजकीय तणाव वाढत असल्याने भांडवली बाजारात घसरण होत आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरणीनेही परिणाम झाल्याचे रिलीग्रेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रांनी सांगितले.

हेही वाचा-शेअर बाजार ७८८ अंशाने कोसळला; अमेरिका-इराणमधील तणावाचा परिणाम

शेअर बाजारातील सर्व क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर विक्रीच्या दबावामधून घसरले आहेत. तर ऑटो, बँकिंग आणि धातू या क्षेत्रातील कंपन्यांचे सर्वाधिक शेअर घसरले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी सर्वात अधिक भारतावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रसमिक ओझा यांनी सांगितले. कच्च्या तेलाचा चलनासह भारतीय बाजारपेठेवरही नकारात्मक परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत २ डॉलरने वाढून ६९.८१ डॉलर झाली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी घसरण होवून ७२.०४ डॉलरवर पोहोचला.

हेही वाचा-सरकारच्या धोरणांविरोधात १० संघटनांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप

मुंबई शेअर बाजार निर्देशांक आज ७८७.९८ अंशाने घसरून ४०,६७५.६३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २३३.६० अंशाने घसरून ११,९९३.०५ वर स्थिरावला. शेअर बाजारात ४.३३ टक्क्यांनी शेअर घसरून बजाज फायनान्सचे सर्वाधिक नुकसान झाले. एसबीआय, इंडुसइंड बँक, मारुती आणि एचडीएफसीचे शेअर घसरले आहेत. मुंबई शेअर बाजारातील १,९४४ कंपन्यांचे शेअर घसरले. तर ६०४ कंपन्यांचे शेअर वधारले. १८१ कंपन्यांचे शेअर स्थिर राहिले आहेत.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.