ETV Bharat / business

तेजीचा परिणाम: गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १६.७० लाख कोटींहून वाढ

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६११.१४ अंशाने वधारल्याने ५१,००० चा पहिल्यांदाच टप्पा ओलांडला आहे. मुंबई शेअर बाजाराने ५१,५२३.३८ हा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला आहे

शेअर बाजार गुंतवणूकदार
शेअर बाजार गुंतवणूकदार
author img

By

Published : Feb 8, 2021, 7:42 PM IST

नवी दिल्ली - शेअर बाजाराचा निर्देशांक सलग सहाव्या सत्रात वधारला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १६.७० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६११.१४ अंशाने वधारल्याने ५१,००० चा पहिल्यांदाच टप्पा ओलांडला आहे. मुंबई शेअर बाजाराने ५१,५२३.३८ हा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात सातत्याने तेजी आहे.

हेही वाचा-देशांतर्गत विमान वाहतूक प्रवाशांच्या संख्येत ४१ टक्क्यांची घसरण

१ फेब्रुवारीपासून शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे १६,७५०,१५४.०५ कोटी रुपयांवरून २,०२,८२,७९८.०८ कोटी रुपये झाले आहे. तर १ फेब्रुवारीपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५,०६३ अंशाने वधारला आहे.

काय आहे शेअर बाजार विश्लेषकांचे मत?

  • रिलीगेअर ब्रोकिंग कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, शेअर खरेदी करणाऱ्यांचे बाजारात वर्चस्व राहिले आहे. तसेच जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजाराचा निर्देशांक उंचावण्यास मदत झाली आहे.
  • जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख (संशोधक) विनोद नायर म्हणाले की, आयटी आणि धातू कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा निधी सुरू राहिल्याने शेअर बाजाराचा निर्देशांक वधारण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा-शेअर बाजाराचे नवे विक्रम सुरुच; ओलांडला ५१ हजारांचा टप्पा

दरम्यान, मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे पहिल्यांदाच २८ नोव्हेंबर २०१४ मध्ये १०० लाख कोटी रुपयांहून अधिक झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.