ETV Bharat / business

'या' कंपन्यांमुळे शेअर बाजाराची टळली घसरण

author img

By

Published : Apr 20, 2020, 6:04 PM IST

खनिज तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरून प्रति बॅरल १२ डॉलरपर्यंत पोहोचले. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ५९.२८ अंशांनी वधारून ३१,६४८ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ४.९० अंशांनी घसरून ९,२६१.८५ वर स्थिरावला.

शेअर बाजार
शेअर बाजार

मुंबई - शेअर बाजार खुला होताना ४०० अंशांनी वधारलेला निर्देशांक पुन्हा घसरणीच्या दिशेने जावू लागला. यावेळी एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपन्यांचे शेअर वधारल्याने शेअर बाजाराची घसरण टळली.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

एचडीएफसी ट्विन्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले. आयटी कंपन्यांचेही शेअर वधारले. एचडीएफसी बँकेचे शेअर ४ टक्क्यापर्यंत वधारले. इन्फोसिसचे शेअर ३ टक्क्यांहून वधारले आहेत.

सन फार्मा, एनटीपीसी, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसचे शेअर वधारले आहेत. तर अॅक्सिस बँकेचे सर्वाधिक शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ आयटीसी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकीचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-भारताच्या नव्या एफडीआय नियमाने चीनचा तिळपापड; ही' दिली प्रतिक्रिया

मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात ४०० अंशांनी वधारला होता. मात्र, त्यानंतर खनिज तेलाची सतत घसरण होत असल्याने शेअर बाजारात घसरण झाल्याचे इक्विटी रिसर्चे प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले.

हेही वाचा-विजय मल्ल्याला भारतात आणायचा मार्ग मोकळा, कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.