नवी दिल्ली – केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत लागू केल्याने स्थलांतरित मजुरांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे कमी किमतीच्या फिचर फोनच्या बाजारपेठेत दुसऱ्या तिमाही दरम्यान 68 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
आयटेलचा फीचर फोनचा बाजारात सर्वाधिक हिस्सा राहिला आहे. आयटेलचा गतवर्षी 10 टक्के हिस्सा होता. नुकतेच जिओ-गुगलमध्ये 4 जी अँड्राईडच्या स्मार्टफोनच्या निर्मितीसाठी भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे. त्याचाही फिचर फोनच्या बाजारपेठेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. देशात 350 दशलक्ष फिचर फोनचे वापरकर्ते आहेत.
चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढत आहे. या परिस्थितीत सॅमसंग आणि देशातील मायक्रोमॅक्स आणि लावा या कंपन्यांना बाजारात पुन्हा हिस्सा मिळविण्याची संधी असल्याचे काउंटरपाँईटच्या संशोधक विश्लेषक शिल्पी जैन यांनी सांगितले.