ETV Bharat / business

Smart Investment Tips : 2022 मध्ये अधिक लाभांश मिळवून देणाकरिता अशी गुंतवणूक करा

author img

By

Published : Jan 1, 2022, 3:35 PM IST

पैसे म्हणजे अशी गोष्ट आहे की, जी तणावमुक्त जगण्यासाठी अनेकप्रकारे जोडलेली असते. जर तुम्हाला योग्य पद्धतीने नियोजन ( robust plans ) करता आले नाही किंवा भविष्याचे नियोजन केले ( financial goals ) नाही तर तुमच्याकडे ठराविक वयानंतर पैसे राहणार नाहीत. त्यामुळे हुशारीने नियोजन करण्याची गरज असते.

आर्थिक नियोजन
आर्थिक नियोजन

हैदराबाद - आपल्याला आर्थिक उद्दिष्ट पूर्ण ( financial goals ) करण्यासाठी बळकट आर्थिक नियोजन ( robust plans ) करण्याची गरज असते. त्यामधून योग्य अशा मालमत्तांचे एकत्रिकरण होत असल्याची खात्री करा.

पैसे म्हणजे अशी गोष्ट आहे की, जी तणावमुक्त जगण्यासाठी अनेकप्रकारे जोडलेली असते. जर तुम्हाला योग्य पद्धतीने नियोजन करता आले नाही किंवा भविष्याचे नियोजन केले नाही तर तुमच्याकडे ठराविक वयानंतर पैसे राहणार नाहीत. त्यामुळे हुशारीने नियोजन करण्याची गरज असते.

हेही वाचा-Improve CIBIL score : गृहकर्ज पटकन मिळवण्यासाठी असा सुधारावा सिबिल स्कोअर

पैसे कमविणे आणि योग्य अशा योजनांमध्ये (schemes) पैसे गुंतविल्यानंतर चांगला लाभांश मिळतो. त्यासाठी प्रत्येक रुपयाचा हिशोब करायला हवा. हे आर्थिक नियोजनाचे पहिले तत्व आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी पाळले पाहिजे. पैसे कमविणे, त्याची बचत करणे आणि त्यामध्ये वाढ करणे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत आर्थिक निजोनासाठी अत्यंत महत्त्वाच्या काही बाबी जाणून घेऊ.

हेही वाचा-Tips for Your Childrens Future Investment : मुलांच्या भविष्याकरिता गुंतवणूक कशी करावी, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

  1. उत्कृष्ट आर्थिक नियोजन ( Best financial plans) - एकाच वेळी पैसे खर्च करणे आणि पैसे वाचविणे आपल्याला शक्य नसते. मात्र, आपण उत्पन्नातील 50 टक्के पैसे हे गरजांसाठी खर्च करू शकतो. तर उर्वरित 20 टक्के पैसे हे मर्यादित गरजा, आपत्कालीन निधी आणि इतर गरजांसाठी खर्च करू शकतो. उर्वरित 30 टक्के पैसे हे दीर्घकालीन गरजांसाठी गुंतवणूक करण्याची गरज असते. त्यामध्ये निवृत्तीनंतरचे नियोजन, मुलांचे उच्च शिक्षण आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीसाठी अशा गरजांचा समावेश आहे. प्रत्येक रुपयासाठी 50-20-30 या नियमाचे पालन ( 50 20 30 rule ) करण्याची गरज आहे.
  2. ( 15-15-15 नियम) 15-15-15 rule - जर तुम्हाला अब्जाधीश होण्याची इच्छा असेल तर या नियमाचे पालन करा. जर तुम्ही वैयक्तिक 15 हजार रुपये 15 वर्षांसाठी योजनांमध्ये गुंतविले तर तुम्हाला 15 टक्के उत्पन्न मिळेल. शेवटी त्यामधून कोट्यवधी रुपये मिळू शकणार आहेत. 15-15-15 हा नियम दोन पद्धतीने काम करू शकतो. हा नियम दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. तसेच एकत्रित चांगला परतावा देण्यासाठी आहे. शेअर बाजारात अस्थिरता असतानाही आपण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकतो. त्यामधून नफा मिळवू शकतो.
  3. इक्विटी फंड गुंतवणूक ( Equity Fund Investment ) - जर तुम्हाला इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची इच्छा असेल तर 100 मधून तुमचे वय वजा करा. उदाहरणार्थ तुमचे वय 30 असेल तर 70 टक्के गुंतवणूक ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करा. इतर 30 टक्के रक्कम ही डेबिटमध्ये गुंतवणूक करा. हे प्रमाण वयाप्रमाणे बदलते. जर तुम्ही आर्थिक नियोजन केले नसेल तर झोपेतून जागे व्हा आणि जास्त लाभांश मिळवून देणाऱ्या आर्थिक योजनांमध्ये हुशारीने गुंतवणूक करा.

हेही वाचा-Investment in Mutual Funds : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून अधिक पैसे कसे कमवावेत ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.