नवी दिल्ली - सोन्याचे दर प्रति तोळा आज ९५४ रुपयांनी घसरून ४३,५४९ रुपये झाले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत वधारल्याने सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीचा दरही प्रति किलो ८० रुपयांनी घसरून ४९,९९० रुपये झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. रुपया डॉलरच्या तुलनेत सकाळच्या सत्रात १६ पैशांनी वधारून ७१.८० झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १,६४८ डॉलरने घसरला आहे. तर चांदी प्रति औंस १८.४० डॉलरने घसरला आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,५०३ रुपये होता.
हेही वाचा-साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे २,४०० कोटी रुपये थकित
सोन्याच्या किमतीमध्ये सोमवारी प्रति तोळा ९५३ रुपयांनी वाढ झाली होती. रुपयाची घसरण आणि जागतिक बाजारातील सोन्याचे वाढलेले दर या कारणांनी सोन्याचे दर सोमवारी वाढले होते.