नवी दिल्ली - सोन्याचा दरात दिल्लीत प्रति तोळा 283 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी मंदावल्याने हे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,853 रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 661 रुपयांची घसरण होऊन 65,514 रुपये दर आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 66,175 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस 1,799 डॉलर आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 25.15 प्रति डॉलर आहेत.
हेही वाचा-GOLD PRICE सोन्यासह चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या, आजचे दर
जून महिन्यापासून दरात घसरण -
लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली होती. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होत आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक-कमी झाले. सोने 47 हजार रुपयांच्या जवळपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. हे दर प्रत्येक दिवसाला 100 ते 200 रुपयांनी कमी-अधिक होत असल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात दिसून आले होते.
हेही वाचा-रिलायन्सला धक्का! फ्युचर ग्रुपबरोबरच्या 24,713 कोटींच्या सौद्याला 'सर्वोच्च' स्थगिती