ETV Bharat / business

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, आजचे दर - gold price latest

सोन्यामधील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. मात्र जागतिक बाजारात अस्थिरता असल्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे.

सोने दर
सोने दर
author img

By

Published : Jun 29, 2021, 7:14 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर मंगळवारी दिल्लीत घसरले आहेत. दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा ९९ रुपयांनी कमी होऊन ४६,१६७ रुपये आहेत.

जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने देशातही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे. मागील सत्रात सोन्याचे दर प्रति तोळा ४६,२५६ रुपये होते. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो २२२ रुपयांनी घसरून ६७,९२६ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,१४८ रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,७७४ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर होऊन प्रति औंस २६.२ डॉलर आहेत. डॉलरचे मूल्य वधारत असतानाही सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-"m going to quite my life right now", असे मित्राला व्हॉट्सअॅप करुन हिमांशीची आत्महत्या

सोन्याच्या किमती कशा ठरतात?

झेन सिक्युरिटीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य आणि सोन्याची किंमत यांचे व्यस्त प्रमाण असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जसे डॉलरचा दर वधारतो, तसे सोन्याच्या किमती घसरतात. तर डॉलरचे मूल्य घसरल्यानंतर सोन्याच्या किमती वाढायला लागतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने काही संकेत दिल्यानंतर अलीकडे सोन्याच्या किमती घसरल्याचे कानथेटी यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.

हेही वाचा-VIDEO- लग्नानंतर नववधुला खाद्यांवर उचलून नेत वर नदी पार!

सोमावरी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याचे दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा ११६ रुपयांनी वाढून ४६,३३७ रुपये होते. तर त्यामागील मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२२१ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर सोमवारी वधारले होते. चांदीचे दर प्रति किलो १६१ रुपयांनी वाढून सोमारी ६६,८५४ रुपये होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.