नवी दिल्ली - सोने-चांदीच्या भावात आज वाढ झाली आहे. सोन्याचा भाव दिल्लीत प्रति तोळा 743 रुपयांनी वाढून 52 हजार 508 रुपये झाला आहे. तर मागणी वाढल्याने चांदीचा भावही प्रति किलो 3 हजार 615 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीचा भाव दिल्लीत प्रति किलो 68 हजार 492 रुपये आहे. तर मागील सत्रात चांदीचा भाव प्रति किलो 64 हजार 877 रुपये होता. तर सोन्याचा भाव मागील सत्रात प्रति तोळा 51 हजार 765 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरून प्रति औंस हा 1 हजार 946 डॉलर झाला आहे. तर चांदीचा भाव हा स्थिर राहून प्रति औंस 27.38 डॉलर आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की आर्थिक विकासदर वाढण्यासाची सकारात्मक चिन्हे दिसत असल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे.