नवी दिल्ली- सोन्याचे दर नवी दिल्लीत प्रति तोळा ५२७ रुपयांनी वाढून ४८,५८९ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने देशात सोने महागल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४८,०६२ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही महागले आहेत. चांदीचा दर १,०४३ रुपयांनी वाढून ७१,७७५ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति तोळा ७०,७३२ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वधारून प्रति औंस १,९०८ डॉलर आहे. तर चांदीचे स्थिर राहून प्रति औंस २८.०७ डॉलर आहे.
हेही वाचा-२ लाख नगद, ५० हजारांचे दागिने घेऊन नववधुचा पोबारा, यापूर्वीही एकाला फसवले होते
डॉलरच्या घसरणीने सोन्याच्या खरेदीत वाढ
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की डॉलर निर्देशांकाची जानेवारीपासून सर्वाधिक घसरण झाली आहे. अमेरिकेच्या राजकोषामधून १० वर्ष मुदतीच्या रोख्यांवरील व्याजदर हा १.५६ टक्क्यापर्यंत घसरला आहे. त्यामुळे धातूच्या खरेदीसाठी गुंतवणुकदारांचा उत्साह वाढला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की सोन्याच्या किमतीत वाढ सुरुच आहे.
हेही वाचा-"...अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता', बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल