नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत 317 रुपयांनी घसरून प्रति तोळा 45,391 रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंचे दर घसरल्याने सोन्याच्या दरात घसरण झाल्याने एचडीएफी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 45,708 रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो 1,128 रुपयांनी घसरून 62,572 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 63,700 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1,749 डॉलरने घसरला आहे. तर चांदीच्या दरात अंशत: घसरून होऊन चांदी 23.91 डॉलर आहे.
हेही वाचा-127 वे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत सादर; मागासवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना पुन्हा मिळणार!
अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरण्याची आणि वाढत्या महागाईची बाजारातील गुंतवणुकदारांना चिंता
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की अमेरिकेत रोजगार निर्मिती वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने सावध पवित्रा घेतला असला तरी रोजगार निर्मिती वाढल्याने बाजाराची अपेक्षा वाढली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरण्याची आणि वाढत्या महागाईची बाजारातील गुंतवणुकदारांना चिंता असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दामानी यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोना लसीकरण ट्रायल डाटावरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
जून महिन्यापासून दरात घसरण -
लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली होती. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही होत आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक-कमी झाले. सोने 47 हजार रुपयांच्या जवळपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. हे दर प्रत्येक दिवसाला 100 ते 200 रुपयांनी कमी-अधिक होत असल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात दिसून आले होते.