ETV Bharat / business

GOLD PRICE सोन्यासह चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या, आजचे दर - सोने दर न्यूज

सोन्याचे दर घसरल्यानंतर चांदीच्या दरात अंशत: घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 18 रुपयांनी घसरून 66,473 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 66,491 रुपये होता.

gold rate
gold rate
author img

By

Published : Aug 2, 2021, 4:34 PM IST

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा 124 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा 46,917 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने देशात हा परिणाम झाला आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर हा प्रति तोळा 47,041 रुपये होता. सोन्याचे दर घसरल्यानंतर चांदीच्या दरात अंशत: घसरण झाली आहे. चांदीचे दर प्रति किलो 18 रुपयांनी घसरून 66,473 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 66,491 रुपये होता.

हेही वाचा-मुंबईत मुलाचा मृत्यू, 17 दिवसांनंतरही कुटुंबीयांना मिळाले नाही मृत्यू प्रमाणपत्र

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 124 रुपयांची घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत 9 पैशांनी घसरून 74.33 रुपयावर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस 1,808 डॉलर आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 25.47 डॉलर आहेत.

हेही वाचा-कृष्णा नदीच्या वादातील याचिकेवर सुनावणीस सरन्यायाधीशांनी दिला नकार, 'हे' दिले कारण

कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू-

गतवर्षी दिवाळीच्या दरम्यान सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजार रुपयांहून अधिक झाले होते. मात्र, कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिम आणि कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्यामधील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे जोखीमच्या वेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.