ETV Bharat / business

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून, घ्या आजचे दर

कोरोना महामारीत जागतिक बाजारात अनिश्चितता आहे. असे असले तरी देशातील शेअर बाजारात सकारात्मक स्थिती आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

सोने दर
सोने दर
author img

By

Published : Oct 7, 2020, 6:47 PM IST

नवी दिल्ली -जागतिक बाजारात अनिश्चितता असताना सोन्याच्या दरात प्रति तोळा ६९४ रुपयांची घसरण झाली आहे. हे दर कमी झाल्याने नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ५१ हजार २१५ रुपये आहे.

मागील सत्रात बाजार बंद होताना सोन्याचा दर प्रति तोळा ५१ हजार ९०९ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो १२६ रुपयांनी वाढून ६३ हजार ४२७ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६३ हजार ३०१ रुपये होता.

हेही वाचा-प्राप्तिकर विभागाचा दणका; शशिकला यांची २ हजार कोटींचा मालमत्ता जप्त

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ६९४ रुपयांनी वाढला आहे. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपान पटेल यांनी सांगितले. गेली दोन दिवस रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत घसरले होते. रुपयाचे मूल्य १३ पैशांनी वधारून आज ७३.३३ वर पोहोचले आहे. विदेशी गुंतवणुकदारांचा वाढता निधी आणि देशातील शेअर बाजारात सकारात्मक स्थितीने रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्याचे पटेल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंससाठी १ हजार ८९२ डॉलर आहे. तर चांदीचा दर स्थिर असून प्रति औंससाठी २३.७३ डॉलर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.