नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ४९५ रुपयांनी वाढून ४७,५५९ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीचे दर प्रति किलो ९९ रुपयांनी घसरून ६८,३९१ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,४९० रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ४९५ रुपये आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ४७,०६४ रुपये होता.
हेही वाचा-नवीन उच्चांक गाठून शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर अंशत: घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे सोन्याचे दर देशात वाढले आहेत. अमेरिकेत सत्तेवर आलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने जनतेसाठी आर्थिक पॅकेजचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी कोरोना महामारीवर सादर केलेल्या विधेयकाचाही समावेश आहे. त्याचा सोने दरवाढीवर परिणाम झाल्याचे पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-इंधनात दरवाढीचा पुन्हा भडका; दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८७ रुपयांहून अधिक
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू आहेत.