नवी दिल्ली- सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 199 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 46,389 रुपये होता. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,588 रुपये होता. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत दर वधारल्याने सोन्याचे दर घसरले आहेत.
चांदीचे दर प्रति किलो 250 रुपयांनी घसरून 62,063 रुपये होते. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 62,313 रुपये होता. भारतीय रुपयाचे दर डॉलरच्या तुलनेत 31 पैशांनी वधारून सकाळच्या सत्रात 73.38 रुपये राहिले आहेत. शेअर बाजारात सकारात्मक स्थिती दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस 1,814 डॉलर राहिले आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून 23.99 डॉलर आहेत.
हेही वाचा-महाराष्ट्राच्या राज्यपालांमुळे उत्तराखंडमध्ये तापले राजकारण, जाणून घ्या नेमके कारण
मुंबई शेअर बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजाराने आजवरचा विक्रमी निर्देशांक नोंदविला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 765.04 अंशाने वधारून 56,889.76 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 225.85 अंशाने वधारून 16,931.05 स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात सर्वाधिक एअरटेलचे 4 टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्याचबरोबर अॅक्सिस बँक, टाटा स्टील, टायटन, मारुती आणि बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. दुसरीकडे टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून सलग पाच तास चौकशी
दरम्यान, सोन्यामधील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित मानली जाते. शेअर बाजारातील स्थिती, रुपयाचे दर, डॉलरचे दर आणि जागतिक बाजारातील स्थिती इत्यादी कारणामुळे सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होता. गतवर्षी दिवाळीत सोन्याचा दर प्रति तोळा 50 हजार रुपयांहून अधिक पोहोचला होता. जगभरात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरू झाल्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाली आहे.