नवी दिल्ली - सोन्याचे दर प्रति तोळा २४३ रुपयांनी घसरून ४९,६५३ रुपये आहे. जागतिक बाजारात मौल्यवान धातुंचे दर घसरल्याने सोन्याचे दर घसरले आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४९,८९६ रुपये तोळा होता.
चांदीचे दर प्रति किलो २१६ रुपयांनी घसरून ६७,१७७ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,३९३ रुपये होता.
अमेरिकेच्या संसदेकडून आर्थिक मदत मंजूर केल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव-
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कमोडिटी रिसर्चे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीवर दबाव होता. अमेरिकन संसदेने कोरोनाच्या काळात मदतीसाठी ९०० अब्ज डॉलरची मदत मंजूर केली आहे. त्यामुळे डॉलरचे मूल्य वधारल्याचेही दमानी यांनी सांगितले.
सोने व चांदीच्या भावात आधी वाढ, आता घसरण-
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन सोने ५८ हजारांपर्यंत गेले होते. तसेच चांदीदेखील ७७ हजारांच्या पुढे गेली होती. मात्र, नंतर बाजारपेठ अनलॉक होत गेली तसतसे सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले. विशेष म्हणजे, विजयादशमी व धनत्रयोदशीलादेखील सोने-चांदीचे भाव आणखी कमी झाले होते.