ETV Bharat / business

चांदी प्रति किलो ३,०९७ रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरातही घसरण - gold rate latest news

चांदीचा दर प्रति किलो ३,०९७ रुपयांनी घसरून ७०,१२२ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ७३,२१९ रुपये होता.

सोने न्यूज
सोने न्यूज
author img

By

Published : Feb 2, 2021, 6:37 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ४८० रुपयांनी घसरून ४७,७०२ रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यानंतर देशातही परिणाम दिसून आल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४८,१८२ रुपये होता.

चांदीचा दर प्रति किलो ३,०९७ रुपयांनी घसरून ७०,१२२ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ७३,२१९ रुपये होता. अमेरिकन सरकारने प्रोत्साहनात्मक पॅकेज जाहीर केल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-खासगीकरणाविरोधात कामगार संघटनांचे बुधवारी देशव्यापी आंदोलन

ट्रेडर आणि गुंतवणुकदारांनी नफा नोंदविण्यासाठी सोन्याची विक्री केली आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर घसरल्याचेही पटेल यांनी सांगितले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसचे उपाध्यक्ष (कमोडिट रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदार हे खूप नफा नोंदवित आहेत.

हेही वाचा-एचडीएफसीच्या आयटी सेवांचे होणार लेखापरीक्षण-आरबीआयचा निर्णय

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सोने-चांदीच्या व्यापाराचा मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी सोने व चांदीचे दर अस्थिर असतात. सोने व चांदीचे दर स्थिर रहावेत, त्या माध्यमातून व्यापाराला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सोने व चांदीच्या व्यापाराला मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधून वगळले पाहिजे, अशी अपेक्षा जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांनी अपेक्षा व्यक्त केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.