नवी दिल्ली - सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ३५० रुपयांनी घसरून ४५, ९५९ रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची विक्री वाढल्याने देशात सोन्याच्या किमती उतरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,३१३ रुपये होता.
सोन्याच्या दरात घसरण झाली असली तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो १५१ रुपयांनी वधारून ६९,१५९ रुपये आहे. तर मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६९,००८ रुपये होता.
हेही वाचा-हळदीला सोन्याची चकाकी; मिळाला दहा वर्षातील उच्चांकी दर
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ३५८ रुपयांनी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस १,७९२ डॉलर आहे. तर चांदीच्या दरात घसरून प्रति औंस २७.५६ डॉलर आहे.
हेही वाचा-इंधनाच्या महागाईनंतर दुसरा झटका: गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग