ETV Bharat / business

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सप्टेंबरमध्ये १ हजार ८४१ कोटींच्या शेअरची ठोक खरेदी - आर्थिक सुधारणा

भारतीय बाजार हा जगभरातील गुंतवणुकदारांसाठी दीर्घ व मध्यम काळासाठी सर्वात आकर्षक राहिला आहे. जर सरकारने आर्थिक सुधारणा कायम ठेवल्या तर गुंतवणुकीत लक्षणीय वाढू शकते.

संग्रहित
author img

By

Published : Sep 15, 2019, 2:17 PM IST

नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात १ हजार ८४१ कोटींच्या शेअरची खरेदी केली. गेली दोन महिने एफपीआयने मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री केली होती.

अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्ध निवळत असल्याच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजारामधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले. एफपीआयने ऑगस्टमध्ये ५ हजार ९२०.०२ कोटींचे भांडवल शेअर बाजारामधून काढले. तर जुलैमध्ये २ हजार ९८५.८८ कोटींचे भांडवल शेअर बाजारामधून काढून घेतले. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक जुलैमध्ये ४.३ टक्के झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांची चिंता कमी झाल्याचे ग्रोचे सीओओ हर्ष जैन यांनी सांगितले.

हेही वाचा-'या' मुद्द्यावरून सरकार-फेसबुकमध्ये पडली वादाची ठिणगी

फंड्सइंडिया.कॉमचे मुख्य संशोधक अरुण कुमार यांच्या मतानुसार युरोपियन केंद्रीय बँकेने प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. त्याचाही गुंतवणुकीवर अनुकूल परिणाम झाला आहे. भारतीय बाजार हा जगभरातील गुंतवणुकदारांसाठी दीर्घ व मध्यम काळासाठी सर्वात आकर्षक राहिला आहे. जर सरकारने आर्थिक सुधारणा कायम ठेवल्या तर गुंतवणुकीत लक्षणीय वाढू शकते. तसेच कंपन्यांनी नफा कमविला तर त्याचाही गुंतवणुकीवर लक्षणीय परिणाम होईल, असे मत आयआयएफएल सेक्युरिटीजचे सीईओ अरिंदम चंद्रा यांनी सांगितले.

हेही वाचा-जीएसटीची नवी नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांना जानेवारी २०२० पासून आधार कार्ड बंधनकारक

Intro:Body:

Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.