ETV Bharat / business

भांडवली बाजारात नकारात्मक स्थिती; एफपीआयने ऑगस्टमध्ये काढून घेतले ८ हजार ३१९ कोटी

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ऑगस्टमध्ये १० पैकी ९ सत्रामध्ये शेअरची ठोक विक्री केल्याचे दिसून आले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जुलैमध्ये  २ हजार ९८५.८८ कोटी रुपये भांडवली बाजारामधून काढून घेतले.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 18, 2019, 1:37 PM IST

नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर अधीभार कर लावण्याचा प्रस्ताव आणि चीन-अमेरिकेमधील व्यापारी युद्ध या कारणाने ऑगस्टमध्ये भांडवली बाजारात नकारात्मक चित्र राहिले आहे. या कारणाने विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) निधी काढून घेण्यावर भर दिला. एफीआयने ऑगस्टमध्ये भांडवली बाजारामधून ८ हजार ३१९ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ऑगस्टमध्ये १० पैकी ९ सत्रामध्ये शेअरची ठोक विक्री केल्याचे दिसून आले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जुलैमध्ये २ हजार ९८५.८८ कोटी रुपये भांडवली बाजारामधून काढून घेतले. अधिभार कर लागू करण्याबाबत अनिश्चितता असल्याने विदेशी गुंतवणूकदार संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा कर लावण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

मंदावलेली अर्थव्यवस्था व मान्सूनची असमाधानकारक स्थिती आदी देशातील कारणामुळे शेअर बाजारात सातत्याने घसरण झाली आहे.

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.