ETV Bharat / business

इराण-अमेरिका तणावाची झळ; सोन्यासह खनिज तेलाच्या दराचा नवा उच्चांक - silver rate today

मागील सत्राच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रति तोळा ५३० रुपयांची वाढ झाली आहे. मागील मार्चच्या कराराच्या तुलनेत चांदीचा दर प्रति किलो ५५० रुपये वधारून ४९,६६१ वर पोहोचला आहे.

Gold, crude oil rate
सोने, कच्चे तेल दर
author img

By

Published : Jan 8, 2020, 12:12 PM IST

मुंबई - अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाचा भारतीय भांडवली बाजाराला फटका बसला आहे. इंडियन फ्युचअर्स मार्केट एमसीएक्समध्ये सोने, चांदी आणि खनिज तेलाचे दर वाढले आहेत. इराणने त्यांच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला चढविल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावात भर पडली आहे.

जागतिक बाजारातील खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशातील फ्युचअर्स मार्केटमधील सोन्याच्या दरानेही नवा उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोटिडी एक्सचेंज (एमसीएक्स) हे भारताचे सोन्याचे सर्वात मोठे फ्युचअर मार्केट आहे. सकाळी साडेनऊ वाजता सोने प्रति तोळा १० ग्रॅमने वाढून ४१,१९३ रुपयावर पोहोचले.

हेही वाचा-इराण- अमेरिका तणाव: भारतीय विमानांनी आखाती देशांवरून उड्डाण टाळावे

मागील सत्राच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रति तोळा ५३० रुपयांची वाढ झाली आहे. मागील मार्च कराराच्या तुलनेत चांदीचा दर प्रति किलो ५५० रुपये वधारून ४९,६६१ वर पोहोचला आहे. तर खनिज तेलाचे दर जानेवारीच्या कराराच्या तुलनेत प्रति बॅरल ७८ रुपयाने वधारून ४,५७२ रुपयावर पोहोचले आहेत. बुधवारी सोन्याचा भाव प्रति औंस १,६०० डॉलरहून अधिक झाला होता. हा गेल्या सात वर्षातील सोन्याचा सर्वाधक भाव आहे.

हेही वाचा-तुर्कीवरून आयात केलेल्या कांद्याचे राज्यांना वितरण; 'हा' आहे भाव

दरम्यान, अमेरिका पाठोपाठ भारताने आपल्या विमानांना इराक, इराण आणि आखाती देशांवरून उड्डाणे टाळण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.