नवी दिल्ली - उद्योगांची संस्था नॅसकॉमने लॅपटॉपसहराऊटरचा समावेश जीवनावश्यक वस्तुत करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्याचा उपयोग लोकांना टाळेबंदीच्या काळात घरातून काम करण्यासाठी होईल, असे नॅसकॉमने म्हटले आहे.
अनेकजण घरातून काम अथवा शिकत आहेत. त्यांच्या मूलभूत साधनांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे कार्यालयासाठी लागणाऱ्या खुर्च्या, राऊटर, लॅपटॉप व डेस्कटॉपचा जीवनावश्यक वस्तुत समावेश करावा, अशी मागणी करणारे ट्विट नॅसकॉमने केले आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात कार्यालयात आणावे, असे नॅसकॉमने सूचविले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आयटी कंपन्या ५० टक्क्यापर्यंत मनुष्यबळ कंपनीत ठेवून काम करू शकतात.
हेही वाचा-टाळेबंदीचा फटका ; एअर आशियाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्क्यापर्यंत कपात
केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना २० एप्रिलनंतर बिगर जीवनावश्यक वस्तुंचा वाहतूक व डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली होती. मात्र, हा निर्णय रविवारी बदलून ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक व डिलिव्हरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा-'या' राज्यातील रेशन दुकानात मिळणार मास्क
शॉपक्ल्यूजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनीही जीवनावश्यक वस्तुंची व्याख्या विस्तारीत करण्याची गरज व्यक्त केली. जेव्हा घरात सगळ्यांना थांबावे लागते तेव्हा फोन, लॅपटॉप व वैयक्तीक स्वच्छतेच्या वस्तू लागतात, असेही सेठी म्हणाले.