नवी दिल्ली - जुन्या चारचाकी विकण्याचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मस असलेल्या कार्स २४ या कंपनीने ही सेवा दुचाकीसाठीही सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना जुन्या स्कूटर, मोपेड आणि दुचाकी या प्लॅटफॉर्मवरून विकणे शक्य होणार आहे.
गुरग्राम येथील कार्स २४ कंपनीने इलेक्ट्रिकल वाहनांची खरेदी व विक्री करण्यासाठीही प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
हेही वाचा-एसबीआयचे कर्मचारी पीएम-केअर्सला देणार आणखी ८ कोटी रुपये
भारत ही दुचाकीची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ही क्षमता लक्षात घेवून सेवेचा विस्तार केल्याचे कार्स २४ चे सहसंस्थापक गजेंद्र जंगिड यांनी सांगितले. कंपनीच्या देशात २१० हून अधिक शाखा आहेत. जे ग्राहक कॅबचा वापर करत होते, असे १५ टक्के ग्राहक दुचाकी घेणार असल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात मदत; महिंद्राने वाहन खरेदीकरिता 'ही' आणली अनोखी योजना