टेक डेस्क - गेल्या काही वर्षापासून ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे केबल टीव्ही आणि डीटीएस सर्व्हिस प्रोवायडर्स समोर मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. अमेरिकी मोशन पिक्चर असोसिएशन (MPAA) च्या रिपोर्टनुसार जगभरात Netflix आणि Amazon Prime Video चे केबल टीव्हीच्या तुलनेत जास्त सब्स्क्रायबर्स आहेत.
रिपोर्ट्सनुसार व्हिडिओ बघणाऱ्या युजर्सची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १३१.२ मिलियनने वाढली आहे. असे पहिल्यांदा झाले आहे, की ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग करणाऱ्या युजर्सची संख्या केबल टीव्ही पाहणाऱ्या युजर्सपेक्षा जास्त ठरली आहे. गेल्यावर्षी केबल टीव्ही बघणाऱ्यांची संख्या ५५६ मिलियन होती जी २०१७ च्या तुलनेत २ टक्क्यांनी कमी आहे. युजर्सची संख्या घटली असली तरी केबल टीव्हीच्या रेव्हेन्यूमध्ये ६.२ अमेरिकी डॉलरने वाढ झाली आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार केबल टीव्ही युजर्सनी ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिसला सब्स्क्राईब केलेले आहे. ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग प्रदान करणारे प्लॅटफॉर्म आपल्या युजर्सनुसार प्रोगामचे वर्गीकरण करत आहेत. त्यामुळेही केबल युजर्स ऑनलाईन व्हिडियो स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सकडे वळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या Netflix, Amazon Prime Video आणि Hulu चे सध्या ६१३.३ मिलियन ग्लोबल युजर्स आहेत.