ETV Bharat / business

फ्रँकलिनप्रकरणी वित्तीय मंत्रालयासह सेबीने हस्तक्षेप करावा; शेअर दलाल संघटनेची मागणी - Association of National Exchange Members of India

एफटीएमएफ योजनेमध्ये काय समस्या होती, हे जाणून घेण्याकरता तज्ज्ञांची समिती नेमावी, अशी संघटनेने मागणी केली आहे.

फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंड
फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंड
author img

By

Published : Apr 24, 2020, 7:46 PM IST

मुंबई - फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंडने (एफटीएमएफ) सहा कर्ज योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा टोकाचा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाल्याचे अॅन्मी या शेअर दलालांच्या संघटनेने म्हटले आहे. अशा स्थितीत सेबी आणि वित्तीय मंत्रालयाने बाजार गुंतवणूकदारांसाठी हस्तक्षेप करावा, अशी संघटनेने मागणी केली आहे.

एफटीएमएफच्या निर्णयाने त्यांच्या गुंतवणूकदारांसह इतर कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना चिंताग्रस्त केले आहे. लाखो गुंतवणूकदारांनी कष्टाने कमविलेल्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी सेबी आणि वित्त मंत्रालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडियाने (अॅन्मी) केली आहे.

एफटीएमएफ योजनेमध्ये काय समस्या होती, हे जाणून घेण्याकरता तज्ज्ञांची समिती नेमावी, अशी संघटनेने मागणी केली आहे. डेबिट म्युच्युअल फंडमध्ये लोक जोखीम घेत विश्वास ठेवतात. अशा प्रकारे कृत्य केल्याने २४ लाख कोटींच्या असलेल्या उद्योगांवरील विश्वास कमी होवू नये, असे अॅन्मीने म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या लढ्याकरता देशभरात ५८७ टन वैद्यकीय साधनांचा पुरवठा

बाजारातील चलनाची तरलता कमी झाल्याने योजना केली बंद-

एफटीएमएफने सर्व सहा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये सुमारे २५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. एफटीएमएफने बाजारातील चलनाची तरलता कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ही माहिती सेबीला दिल्याचेही एफटीएमएफने म्हटले आहे.

हेही वाचा-सरकारच्या मदतीने अखिल भारतीय व्यापारी संघटनाच काढणार ई-कॉमर्स वेबसाईट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.