ETV Bharat / business

बीएमडब्ल्यूलाही मंदीची झळ; विक्रीत १३.८ टक्क्यांची घसरण - वाहन विक्री

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ रुद्रतेज सिंह म्हणाले, २०१९ वर्ष हे वाहन उद्योगासाठी सोपे नव्हते. वाहन क्षेत्र अडचणीमधून जात असताना आम्ही २०२० वर्षासाठी तयार झालो आहोत.

BMW
बीएमडब्ल्यू
author img

By

Published : Jan 9, 2020, 1:19 PM IST

नवी दिल्ली - श्रीमंतीचे प्रतीक मानली जाणाऱ्या बीएमडब्ल्यू वाहनांच्या विक्रीला मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बसला आहे. बीएमडब्ल्यू वाहनांच्या विक्रीत जानेवारीत १३.८ टक्क्यांची घट झाली आहे. जानेवारीत ९,६४१ बीएमडब्ल्यू वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी ११,६०५ बीएमडब्ल्यू वाहनांची विक्री झाली होती.

गतवर्षी ९ हजार बीएमडब्ल्यू आणि ६४१ मिनी युनिटची विक्री झाली होती. तर २,४०३ बीएमडब्ल्यू मोटररॅड मोटरसायकलची विक्री झाली होती.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ रुद्रतेज सिंह म्हणाले, २०१९ वर्ष हे वाहन उद्योगासाठी सोपे नव्हते. वाहन क्षेत्र अडचणीमधून जात असताना आम्ही २०२० वर्षासाठी तयार झालो आहोत. बीएमडब्ल्यू ३ श्रेणी आणि बीएमडब्ल्यू एक्स१ श्रेणीतील वाहने नव्या ग्राहकांनी घ्यावी, यासाठी केलेल्या प्रयत्नात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. तसेच बीएमडब्ल्यू एक्स५, बीएमडब्ल्यू६ श्रेणीतील ग्रॅन टुरिझ्मो आणि बीएमडब्ल्यू ७ श्रेणीतील वाहने अद्ययावत (अपग्रेड) करण्यात आली आहेत. वाहनांचे नवे मॉडेल आणि मागणी असलेल्या ब्रँडसाठी चांगले वातावरण असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात ५०० अंशाची उसळी : मध्यपूर्वेतीत तणाव कमी होण्याच्या शक्यतेचा परिणाम

बीएमडब्ल्यू ५ आणि बीएमडब्ल्यू ३ या श्रेणीतील वाहनांना सर्वाधिक मागणी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे वर्ष २०१९ मध्ये सर्वच कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण झाली आहे.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.