नवी दिल्ली - मारुती सुझुकीच्या प्रिमियम हॅचबॅकमधील बलेनो या कारने विक्रीत ८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही कार २०१५ मध्ये लाँच झाली होती.
बलेनोने ५९ महिन्यांत विक्रीचा ८ लाखांचा टप्पा ओलांडल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. मारुती सुझुकीचे संचालक (विपणन आणि विक्री) शंशाक श्रीवास्तव म्हणाले, की कमी कालावधीत बलेनोने ८ लाख ग्राहकांना आनंदित केले आहे. ग्राहककेंद्रित तत्वज्ञान आणि बलेनोच्या मुलभूत संकल्पनांनी हे शक्य झाले आहे.
बलेनोची विदेशात होते निर्यात
बलेनोमुळे मारुती सुझुकीला प्रिमिय हॅचबॅकच्या श्रेणीत रुजण्यासाठी मदत झाली आहे. बलेनोची २०० शहरांमधील ३७७ नेक्सा आउटलेटमधून विक्री होते. ऑस्ट्रेलिया, युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मध्यपूर्व आणि दक्षिण पूर्व आशियामधील देशांमध्ये बलेनोची निर्यात करण्यात येते. या कारमध्ये स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञान आणि १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. ही कार सरकराच्या निमयानुसार बीएस-६ इंजिन क्षमतेचे आहे.