नवी दिल्ली - जर्मनीची लक्झरी कंपनी ऑडीने आगामी एसयूव्ही क्यू 2 या कारच्या खरेदीसाठी बुकिंग आजपासून सुरू केले आहे. ही कार चालू महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशात लाँच होणार आहे.
ऑडी क्यू2 हे कंपनीचे देशातील पाचवे उत्पादन असणार आहे. केवळ 2 लाख रुपयात ऑडी कंपनीच्या वेबसाईटवरून एसयूव्ही क्यू 2 बुक करता येणार आहे. तसेच ग्राहकांना ऑडीच्या डीलरशीपकडेही कार बुक करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ग्राहकांना कारसोबत 5 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज देण्यात येणार आहे. हे पॅकेज पीस ऑफ माईंड नावाने देण्यात येणार आहे. तर 5 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी देण्यात येणार आहे. ऑडी क्यू 2 हे भारतासाठी अत्यंत उपयुक्त उत्पादन आहे. यामध्ये आलिशान अशी सर्व सोयी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह धिल्लन यांनी सांगितले.
कंपनीकडून विक्रीत तरुणांवर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार 2 हजार 500 कारची आयात करता येते. या आयात केलेल्या कारची देशात विक्री करण्यात येते. त्यासाठी स्थानिक नियामक संस्थांकडून परवानगी लागत नाहीत. मात्र, जपान आणि युरोपियन युनियनमध्ये आयात केलेल्या कारसाठी विविध परवानग्या घ्या लागतात. त्यामुळे हे कारचे मॉडेल पूर्णपणे जर्मनीमध्ये तयार झालेले असणार आहे. क्यू2 एसयूव्हीमध्ये 2 लिटर पेट्रोलचे इंजिन असणार आहे. तर पेटंट असलेले क्वाट्रो तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.