लखनऊ - कोरोनाच्या संकटात उत्तरप्रदेशमध्ये अनेक मजूर परतले आहेत. या मजुरांना योगी आदित्यनाथ सरकार महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (मनरेगा) रोजगार देणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव (ग्रामीण विकास) मनोज सिंह म्हणाले, की स्थलांतरीत तरुण टाळेबंदीमुळे देशभरांमधून गावांमध्ये परतत आहेत, अशा परिस्थितीत आर्थिक संकट निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मनरेगामधून त्यांना रोजगार देण्यात येणार आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात संधी शोधणाऱ्या चीनला बसणार पायबंद; सरकारने काढले हे आदेश
जर एखाद्या व्यक्तीकडे मनरेगा योजनेतील जॉब कार्ड नसेल तर ते कार्ड त्याला उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोरोनाची लागण न झालेल्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मनरेगाची कामे २० एप्रिलनंतर करण्यात येणार आहेत. टाळेबंदीमुळे घसरलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मनरेगामधून चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
हेही वाचा-कौतुकास्पद! आयआयटी दिल्लीकडून कोरोना वॉरिअरसाठी 'कवच'; जाणून घ्या किंमत