ETV Bharat / business

गेल्या तीन महिन्यात मार्चमध्ये घाऊक महागाईचा उच्चांक, ३.१८ टक्क्यांची नोंद

घाऊक महागाईचा निर्देशांक (डब्ल्यूपीआय) हा २.९३ टक्के फेब्रुवारीमध्ये नोंदविण्यात आला आहे. तर जानेवारीत २.७६ टक्के महागाईचा निर्देशांक नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये ३.४६ टक्के महागाईचा निर्देशांक नोंदविण्यात आलेला होता.

बाजारपेठ
author img

By

Published : Apr 16, 2019, 3:50 PM IST

नवी दिल्ली - गेल्या तीन महिन्यात मार्चमध्ये उच्चांक केला आहे. अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढलेल्या किंमतीमुळे घाऊक महागाई निर्देशांक ३.१८ टक्के नोंदविण्यात आली आहे. ही आकडेवारी आज केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी मार्चमध्ये घाऊक महागाईचा निर्देशांक हा २.७४ टक्के नोंदविण्यात आला होता.

घाऊक महागाईचा निर्देशांक (डब्ल्यूपीआय) हा २.९३ टक्के फेब्रुवारीमध्ये नोंदविण्यात आला आहे. तर जानेवारीत २.७६ टक्के महागाईचा निर्देशांक नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये ३.४६ टक्के महागाईचा निर्देशांक नोंदविण्यात आलेला होता.

अन्नाच्या किंमती या ५.६८ टक्क्यापर्यंत वाढल्याचे मार्च २०१९ मध्ये दिसून आले. फेब्रुवारीमध्ये ४.२८ टक्के एवढे प्रमाण होते. भाजीपाल्याची महागाई मार्चमध्ये २८.१३ टक्के एवढी वाढली
होती. तर फेब्रुवारीमध्ये ६.८ टक्के एवढे प्रमाण होते. डाळी आणि गव्हाच्या महागाईचा निर्देशांक मार्चमध्ये १०.६३ टक्के व १०.१३ टक्के वाढला आहे.

कांद्याच्या किमतीत मात्र ३१.३४ टक्के घट झाली आहे. घाऊक महागाईच्या निर्देशांकात असलेल्या विविध वर्गवारीत 'इंधन आणि उर्जा' हा घटक आहे. फेब्रुवारीत इंधन आणि उर्जेची असलेली २.२३ टक्क्यांची महागाई ही मार्चमध्ये ५.४१ टक्के झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक किरकोळ महागाईचा निर्देशांक लक्षात घेऊन पतधोरणाचा निर्णय घेते. गेल्या महिन्यात आरबीआयने रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली आहे.

Intro:Body:

WPI inflation spikes to 3.18 pc in March on costlier food, fuel

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.