ETV Bharat / business

जागतिक आर्थिक मंचचा जागतिक जोखीम अहवाल 2021 - जागतिक आर्थिक मंच लेटेस्ट न्यूज

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार, काळाच्या ओघात येणाऱ्या आर्थिक जोखमी जगासाठी गंभीर धोका बनतील. तर, सर्वांत निकटचे धोके बनण्याची दाट शक्यता असलेले, जे बहुधा येत्या दोन वर्षांत संभवतात, त्यामध्ये रोजगार आणि रोजीरोटीचे संकट, युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झाल्याची भावना, डिजिटल असमानता, आर्थिक साचलेपणा, मानवाकडून होत असलेली पर्यावरणाची हानी, सामाजिक एकात्मतेचा ऱ्हास आणि दहशतवादी हल्ले यांचा समावेश आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम लेटेस्ट न्यूज
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Jan 26, 2021, 5:26 PM IST

नवी दिल्ली - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल रिस्क रिपोर्टच्या 16 व्या आवृत्तीत सामाजिक अडथळ्यांमुळे होणार्‍या जोखमींचे विश्लेषण केले गेले आहे. यामध्ये मानवी आरोग्यासाठी सतत निर्माण होणाऱ्या आणि वाढत्या जोखमी, वाढती बेरोजगारी, डिजिटल दरी वाढणे, तरुणांचा भ्रमनिरास आणि भू-राजकीय विखंडन यांच्याद्वारे प्रकट झालेला धोका यांचा समावेश आहे. व्यवसायांमध्ये विसकळीत होण्याचा धोका असतो, ज्यामुळे भविष्यातील बाजारपेठांना कामगार आणि कंपन्यांना मोठ्या संख्येने मुकावे लागू शकते.

जागतिक आर्थिक मंच लेटेस्ट न्यूज
जागतिक आर्थिक मंचचा जागतिक जोखीम अहवाल 2021

जागतिक जोखीम आकलन

  • पुढील दहा वर्षातील सर्वाधिक संभाव्य जोखमींपैकी अत्यंत विषम हवामान, हवामानातील बदलांनुसार कृती करण्यात अपयश आणि मानवी कार्यकलापांमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान. तसेच, डिजिटल ऊर्जा एकाग्रता, डिजिटल असमानता आणि सायबर सुरक्षा अपयश. पुढील दशकात होणाऱ्या सर्वाधिक दुष्परिणामांपैकी, संसर्गजन्य रोग अव्वल स्थानावर आहेत. यापाठोपाठ हवामानातील बदलांनुसार कृती करण्यात आलेले अपयश आणि इतर पर्यावरणीय जोखमींचा क्रमांक आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर विध्वंस करणारी शस्त्रे, रोजीरोटीचे संकट, कर्जाचे संकट आणि आयटी पायाभूत सुविधा खंडित होणे यांच्यामुळे पुढील दहा वर्षांत आर्थिक जोखमींची स्थिती निर्माण होऊ शकते.

हेही वाचा - केंद्रीय अर्थसंकल्प: कृषी क्षेत्राचा वित्त पुरवठा वाढण्याची शक्यता

  • काळाच्या ओघात या जोखमी जगासाठी गंभीर धोका बनतील. तर, सर्वांत निकटचे धोके बनण्याची दाट शक्यता असलेले, जे बहुधा येत्या दोन वर्षांत संभवतात, त्यामध्ये रोजगार आणि रोजीरोटीचे संकट, युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झाल्याची भावना, डिजिटल असमानता, आर्थिक साचलेपणा, मानवाकडून होत असलेली पर्यावरणाची हानी, सामाजिक एकात्मतेचा ऱ्हास आणि दहशतवादी हल्ले यांचा समावेश आहे.
  • भविष्याविषयी निश्चित कल्पना स्पष्ट नसताना मालमत्तांच्या अस्थिरपणे कमी-जास्त होणाऱ्या किमती (अ‌ॅसेट बबल्स), किंमत अस्थिरता, वस्तूंचे दर अचानकपणे पडणे किंवा चढणे यामुळे निर्माण होणारे आर्थिक धक्के आणि कर्जाचे संकट या आर्थिक जोखमी येत्या 3-5 वर्षाच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता मुख्यत्वे दिसत आहे. त्यानंतर भूराजनैतिक जोखीम, आंतरराज्यीय संबंध आणि संघर्ष आणि संसाधन भौगोलिकरण समावेश आहे. येत्या 5 ते 10 वर्षांच्या टप्प्यात जैवविविधतेचे नुकसान, नैसर्गिक संसाधनांच्या कमतरतेमुळे आलेली संकटे आणि हवामानातील बदलांनुसार योग्य कृती करण्यात अयशस्वी होण्यासारख्या पर्यावरणीय जोखमींची मोठी शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर विध्वंस करणारी शस्त्रे, तंत्रज्ञानाचा प्रतिकूल परिणाम आणि राज्ये किंवा बहुपक्षीय संस्थांचे संकलन याही समस्यांची दाट शक्यता आहे.

आर्थिक स्थिती दिवसेंदिवस नाजूक/कमजोर आणि सामाजिक सामाजिक विभागणी वाढतेय

  • आरोग्यसेवा, शिक्षण, आर्थिक स्थैर्य आणि तंत्रज्ञानातील मूलभूत असमानतेमुळे संकटाची स्थिती निर्माण झाली असून याच्यामुळे काही गट आणि देशांवर अप्रिय परिणाम झाले आहेत. लेख लिहितेसमयी कोविड -19 मुळे तब्बल दोन दशलक्षांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर, आर्थिक आणि दीर्घ काळासाठी आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामांचा आणखी विनाशकारी परिणाम होईल.
  • जगभरात पसरलेल्या कोविड -19 महामारीमुळे बसलेल्या आर्थिक धक्क्यामध्ये एकट्या 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत 495 दशलक्ष रोजगार गमावले गेले. याच्यामुळे त्वरित असमानता वाढेल. परंतु, याची तितकीच असमान नुकसान भरपाईही होऊ शकते. 2020 मध्ये केवळ 28 अर्थव्यवस्था वाढल्याची अपेक्षा करण्यात येत आहे. जीआरपीएसला प्रतिसाद देणाऱ्या जवळपास 60 टक्के लोकांनी या 'संसर्गजन्य रोगा'स आणि 'रोजीरोटीचे संकटा'स जगातील सर्वात कमी अल्पकालीन धोका म्हणून ओळखले. जीवितहानी आणि रोजीरोटी गमावल्यामुळे 'सामाजिक एकरुपतेचा ऱ्हास' होण्याची जोखीम वाढेल, हादेखील एक कमी कालावधीसाठी असणारा मात्र, गुंतागुंतीचा धोका असल्याचे जीआरपीएसमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा - विदेशातील गुंतवणुकीत भारतीय कंपन्यांची ४२ टक्क्यांनी घट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.