वॉशिंग्टन - कोरोना महामारीमुळे जगभरातील ६ कोटी लोक गरिबीत ढकलले जाणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी १००हून अधिक देशांमध्ये १६० अब्ज डॉलरचे आपत्कालीन मदत करण्यात येत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
कोरोना आणि टाळेबंदीने जगातील ६ कोटी लोकांना अत्यंत गरिबीत जावे लागण्याची शक्यता आहे. नुकतेच गरिबीचे प्रमाण कमी झाले होते, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा-कोरोनाचे निदान होणार सेकंदात! 'या' देशात तंत्रज्ञान विकसित
देशांनी पुन्हा विकासदराची गती गाठण्यासाठी आरोग्याच्या आपत्कालीन स्थितीला लवचिक पद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा. गरिबांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तर खासगी क्षेत्र मजबूत ठेवण्यासाठी आणि पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे जागतिक बँकेचे अध्यक्षांनी सांगितले.
हेही वाचा-उबेरपाठोपाठ ओलाचीही कर्मचारी कपात; १,४०० जणांच्या नोकरीवर गदा