ETV Bharat / business

तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेजचे उद्योगजगतासह पंतप्रधानांकडून स्वागत

कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी म्हणाले, की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या ११ सुधारणांपैकी ३ प्रशासकीय सुधारणा सर्वात महत्त्वाच्या आहेत. हे पहिल्यांदाच मोदी सरकारच्या काळात होत आहे.

author img

By

Published : May 16, 2020, 10:20 AM IST

तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज
तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेजमध्ये कृषी सुधारणांवर भर दिला आहे. या पॅकेजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. तर कृषी उद्योगजगताने कोरोनाचे संकट हे शेतकऱ्यांसाठी संधी ठरू शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेजवर प्रतिक्रिया देताना म्हटले, की या पॅकेजमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत होणार आहे. पॅकेजमुळे कष्टकरी शेतकरी, मच्छीमार, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन क्षेत्राला मदत होणार आहे.

  • I welcome today’s measures announced by FM @nsitharaman. They will help the rural economy, our hardworking farmers, fishermen, the animal husbandry and dairy sectors. I specially welcome reform initiatives in agriculture, which will boost income of farmers. #AatmaNirbharDesh

    — Narendra Modi (@narendramodi) May 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी म्हणाले, की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या ११ सुधारणांपैकी ३ प्रशासकीय सुधारणा सर्वात महत्त्वाच्या आहेत. हे पहिल्यांदाच मोदी सरकारच्या काळात होत आहे. शेवटच्या तीन सुधारणांनी उद्दिष्ट पूर्ण होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-कोरोनाचा फटका; एप्रिलमध्ये निर्यातीत ६०.२८ टक्क्यांची घसरण

सरकारने धाडसी सुधारणा करत असताना कोरोनाचे संकट हे शेतकऱ्यांसाठी संधीत रुपांतरित करण्याचा प्रयत्न असल्याचे दाखवून दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी ही त्वरित आणि उत्साहाने करण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यातील सुधारणा आणि कृषी विपणन सुधारणा यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. हा निर्णय खरोखरच प्रोत्साहनात्मक असल्याची प्रतिक्रिया सीआयआय या उद्योग संघटनेचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी दिली.

हेही वाचा-पशुसंवर्धन विकासाच्या पायाभूत सुविधांकरता केंद्र सरकार देणार १५ हजार कोटी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.