नवी दिल्ली - जागतिक बँकेने उद्योगानुकलतेचा अहवाल प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनकडून फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या चीनमधून भारतात येत असल्याचे सरकारमधील सूत्राने म्हटले आहे.
जागतिक बँकेच्या ग्रुपकडून विविध देशांमधील गुंतवणुकीकरिता असलेले वातावरण स्पष्ट करणारा अहवाल प्रसिद्ध होणार नाही. कारण, त्यामध्ये काही अनियमितता असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही आघाडीच्या बँकांमधील अधिकाऱ्यांकडून चीनला उद्योगानुकूलतेत वरचा क्रमांक देण्यासाठी जागतिक बँकेवर 2017 पासून दबाव निर्माण करण्यात येत होता.
हेही वाचा-कोरोनाच्या काळात नितीन गडकरींकडून युट्यूबचा वापर; महिन्याला कमवितात 'इतके' लाख रुपये
सुत्राच्या माहितीनुसार भारताच्या आकडेवारीत कोणतीही अनियमितता आढळली नाही. गुंतवणुकीसाठी भारत हे जगातील विश्वसनीय आणि प्राधान्य असलेले ठिकाण राहिले आहे. चीनने केलेल्या फसवणुकीमुळे तेथील अनेक उत्पादन प्रकल्प भारतामध्ये येणार असल्याचे सूत्राने सांगितले. ऑक्टोबर 2019 च्या आकडेवारीनुसार जागतिक बँकेच्या उद्योगानुकलतेत भारत हा 14 क्रमांकाने सुधारून 63 व्या क्रमांकावर आला आहे.
हेही वाचा-चारधाम यात्रेचा 18 सप्टेंबरपासून उत्तराखंडमध्ये पुन्हा श्रीगणेशा