वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षित आणि टप्प्याटप्प्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था खुली करण्याची भूमिका जाहीर केली आहे. कोरोना महामारीने अमेरिकेत ५० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमेरिकेत ९५ टक्क्यांहून अधिक ३.३० कोटी लोक टाळेबंदीमुळे घरात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे यासारखा उपाय करण्यात येत आहे. ही टाळेबंदी १ मेपर्यंत पुढे ढकलण्याचे संकेत आहेत. मात्र, अर्थव्यवस्था हळूहळू खुली करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा-बँक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापर्यंत करता येणार नाही संप, कारण...
गेल्या काही आठवड्यात २.६ अमेरिकन लोकांनी बेरोजगारीमुळे मदतीसाठी सरकारकडे अर्ज केले आहेत. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्ष २०२० मध्ये अमेरिकेचा विकासदर हा वृद्धीदर न नोंदविता घसरणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-जिओपाठोपाठ अॅमेझॉनही दुकानदारांना देणार ऑनलाईन सुविधा