मुंबई - आयटी कंपनी टेक महिंद्राला बीपीओच्या व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. असे असले तरी कंपनी येत्या आर्थिक वर्षात कंपनी ५ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कारण, कंपनीकडून कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रणेकेडून मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे.
तंत्रज्ञानामुळे एकाच कर्मचाऱ्याला अनेक कामे करता येणे शक्य आहेत. त्यामुळे मनुष्यबळात कपात करणे शक्य असल्याचे टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरनानी यांनी सांगितले. टेक महिंद्राने डिसेंबरअखेर २,५०० मनुष्यबळाची कपात केली आहे. गुरनानी म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२० अखेर सुमारे ४३ हजार कर्मचारी कंपनीमध्ये होते. प्रत्यक्षात ३८ हजार कर्मचारी कंपनीत असणे अपेक्षित आहे. कारण, उत्पादकता वाढली आहे. तर महसुलाचे प्रमाण कमी झाले आहे. येत्या काळात मनुष्यबळाच्या कपातीत सातत्य राहणार नाही, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा-'स्वच्छ इंधनाचा वापर करण्याकरता एलपीजी किटवर सवलत द्यावी'
कंपनीच्या व्यवसायात मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत डिसेंबरच्या तिमाहीत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीपीएस (बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस) हे बळकट क्षेत्र आहे. कंपनीकडे चांगली कंत्राटे येणार आहेत. येत्या काळात आघाडीच्या टेलिकॉम पुरवठादार कंपनीबरोबर भागीदारी करू शकते, असे सी. पी. गुरनानी संकेत दिले आहेत.
हेही वाचा-'वैद्यकीय उपकरणांना लागणाऱ्या कच्चा मालावरील आयात शुल्कात कपात करा'
दरम्यान, बीपीओ क्षेत्रातील कॉल सेंटर हे रोजगार देणारे मोठे क्षेत्र मानले जात होते. बीपीओ क्षेत्राच्या सेवेला विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी होती. कोरोनाच्या काळात देशातील रोजगाराचे प्रमाण कमी झाले आहे.