ETV Bharat / business

कोरोनानंतरचे जग कसे असेल? मुख्य अर्थसल्लागारांनी व्यक्त केली 'ही' शक्यता

author img

By

Published : Apr 17, 2020, 7:11 PM IST

भारतीयांनी नवे जग तयार करण्यासाठी स्वत: ला सक्रिय ठेवले पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले. हे बचावात्मक पद्धतीने होवू शकत नाही. आपण केवळ व्यवसायाची जोखीम घ्यायला नको. तर आपण लोक म्हणून अधिक व्यापकपणे वाढणाऱ्या संधी आणि प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पहायला हवे.

संजीव सन्याल
संजीव सन्याल

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटानंतर सामाजिक-अर्थव्यवस्था, पुरवठा साखळी, भौगोलिक राजकारण बदलणार असल्याचे मत वित्तीय मंत्रालयाचा मुख्य अर्थसल्लागार संजीव सन्याल यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या संकटापूर्वीप्रमाणे हे जग नसेल, असेही त्यांनी एका लेखात म्हटले.

कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था ढासळत असताना त्याबाबत भारताचा दृष्टीकोन काय आहे, यावर संजीव सन्याल यांनी लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले, की कोरोनानंतरच्या जगाची पुनर्रचना करताना महत्त्वाचा विचार केला पाहिजे, की आपण कोरोनापूर्वीच्या जगात परतणार नाहीत. कोरोनाच्या संकटनंतरचे तंत्रज्ञान व जागतिक प्रशासनाची रचना ही वेगळी असणार आहे.

हेही वाचा-खूशखबर! कोरोनाच्या संकटातही 'ही' कंपनी १,५०० जणांना देणार नोकऱ्या

भारतीयांनी नवे जग तयार करण्यासाठी स्वत:ला सक्रिय ठेवले पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले. हे बचावात्मक पद्धतीने होवू शकत नाही. आपण केवळ व्यवसायाची जोखीम घ्यायला नको. तर आपण लोक म्हणून अधिक व्यापकपणे वाढणाऱ्या संधी आणि प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पहायला हवे. अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकार टप्प्याटप्प्यात पावले उचलत असल्याचेही त्यांनी ट्विट केले. कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करताना सरकारने काही चलनाची तरलता घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा-गुगल प्लेमध्ये लहान मुलांकरता 'ही' सुविधा होणार सुरू

सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक टप्प्याटप्प्याने पावले उचलत आहे. याचा अर्थ सरकारला गांभीर्य नाही अथवा सरकारला मोठ्या गोष्टी करण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याला कोरोनानंतर मोठी पुनर्रचना करायची आहे. जर आपण आरोग्याची स्थिती हाताळली तर हे दूर नाही, असे त्यांनी लेखात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.