नवी दिल्ली - बँकांकडील थकित मालमत्तेचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठीचे पोर्टल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत लाँच केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक बँकांचे प्रमुख, इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बँकांमधील प्रश्नाबाबत चर्चा केली. यावेळी वित्तीय सचिव, महसूल सचिव, अर्थव्यवहार सचिव, इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव, सीबीआय संचालक, आरबीआयचे प्रतिनिधी आणि एनपीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईन आर्थिक व्यवहारावर आकारले जाणारे मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) १ जानेवारी २०२० पासून बंद होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
हेही वाचा-१.१३ लाख कोटी रुपयांचे बँकांमध्ये घोटाळे; सहा महिन्यातच उच्चांक
ज्या कंपन्यांची उलाढाल ५० कोटी रुपयांहून अधिक आहे, अशा कंपन्यांनी रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय क्यूआर कोडने व्यवहार करण्याची ग्राहकांकरिता सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तसेच सर्व बँकांकडून रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय देयक व्यवस्था लोकप्रिय होण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार असल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-गुंतवणुकीसह उपभोक्तता वाढविण्याचे सर्वात मोठे आव्हान - शक्तिकांत दास