ETV Bharat / business

देशातील चांगल्या वातावरणाने विदेशातील गुंतवणुकदारांचे भारताला प्राधान्य - Piyush Goyal latest news

गतवर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत १४.०६ अब्ज डॉलरची गुंतवणूक राहिली होती. पियूष गोयल यांनी ट्विट करून देशात थेट विदेशी गुंतवणूक वाढल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की कोरोनाच्या काळातही एफडीआयचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट होत आहे.

पियूष गोयल
पियूष गोयल
author img

By

Published : Nov 28, 2020, 6:09 PM IST

नवी दिल्ली - थेट विदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) प्रमाण हे जुलै ते सप्टेंबर २०२० मध्ये प्रमाण वाढून २८.१ अब्ज डॉलर राहिले आहे. देशातील वातावरणामुळे जगभरातील गुंतवणुकदारांनी भारताला प्राधान्य दिल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.

गतवर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत १४.०६ अब्ज डॉलरची गुंतवणूक राहिली होती. पियूष गोयल यांनी ट्विट करून देशात थेट विदेशी गुंतवणूक वाढल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की कोरोनाच्या काळातही एफडीआयचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील असलेल्या वातावरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी देशामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचे सूचित होत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत एफडीआयचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे.

संबंधित बातमी वाचा-दिलासादायक! महामारीत एप्रिल ते सप्टेंबरमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीत १५ टक्क्यांनी वाढ

मॉरिशियस आणि सिंगापूरमधून गुंतवणुकीचे प्रमाण अधिक

केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाने थेट विदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीची माहिती दिली आहे. या आकडेवारीनुसार मॉरिशियस आणि सिंगापूर हे एफडीआयचे मुख्य स्त्रोत राहिले आहेत. देशात एप्रिल ते सप्टेंबरमध्ये येणाऱ्या एकूण एफडीआयपैकी २९ टक्के मॉरिशिसयमधील तर २१ टक्के हे सिंगापूरमधून राहिले आहे. त्यानंतर अमेरिका, नेदरलँड आणि जपानमधून ७ टक्क्यांहून अधिक एफडीआयचा हिस्सा राहिला आहे.

देशात आर्थिक मंदी-

कोरोना महामारीचा फटका बसलेली अर्थव्यवस्था काहीअंशी सावरत आहे. असे असले तरी जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत देशाच्या विकासदरात ७.५ टक्के घसरण म्हणजे उणे ७.५ टक्के विकासदर राहिला आहे. या घसरणीने देशात आर्थिक मंदी असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. एप्रिल-जुनच्या तिमाहीत विकासदरात २३.९ टक्के घसरण झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.