नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जीएसटीवरून टीकास्त्र सोडले. केंद्राने कर व्यवस्थेला वाईट कायद्यात रुपांतरित केल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी केली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले, की जीएसटी ही सुरुवातीला चांगली कल्पना होती. त्याचे भाजपने वाईट कायद्यात रुपांतर केले. कराचे दर भयानक होते. प्रत्येक उद्योजकाकडे कर चुकवे असल्याप्रमाणे कर अधिकाऱ्यांकडून पाहण्यात येत होते. केंद्रात सत्ता असलेल्या भाजपने जीएसटीमागील कल्पना संपविल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.
हेही वाचा-गेल्या चाळीस वर्षातील सर्वात अंधकारमय वर्ष...घसरलेल्या जीडीपीवरून पी. चिदंबरम यांची टीका
जीएसटीमागील कल्पना ही आता शांतीत विसावली
अधिकाऱ्यांचा समावेश असलेली जीएसटी अंमलबजावणी समिती म्हणजे थरथरणाऱ्या कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री ही मंत्रिस्तरीय समितीला एनडीए आणि पाठिंबा देणाऱ्या समितीचा विस्तार असल्यासारखे वागवित आहेत. जे अर्थमंत्री विरोधी मत व्यक्त करतात, त्यांना शाळेतील चुकीच्या विद्यार्थ्याप्रमाणे वागणूक देण्यात येते. जीएसटीमागील कल्पना ही आता शांतीत विसावली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने कोरोनाच्या लढ्यात परिणामकारक ठरणारी लस, औषधे आणि इतर उपकरणांना जीएसटीमधून वगळण्याची सातत्याने मागणी केली आहे. याबाबत जीएसटी परिषेदतही काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांनी जीएसटीचे प्रमाण ५ टक्क्यांऐवजी ०.१ टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम; चालू आर्थिक वर्षाचा अंदाजित विकासदर घसरणार- एसबीआय
मंत्रिस्तरीय समिती जीएसटीबाबत घेणार निर्णय
दरम्यान, जीएसटी परिषदेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यांची मंत्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोरोनाच्या लढ्यात वापरण्यात येणारी लस, औषधे व यांत्रिकी उपकरणांवरील जीएसटीबाबत जीएसटी परिषदेला शिफारसी करणार आहे.
सरकारने अर्थतज्ज्ञांसह विरोधकांचा सल्ला काळजीपूर्वक ऐकावा-
जे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये घडले आहे, ते आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये घडू नये. सरकारने चुका मान्य केल्या पाहिजेत. धोरण मागे घेतले पाहिजेत. सरकारने अर्थतज्ज्ञांसह विरोधकांचा सल्ला काळजीपूर्वक ऐकायला हवा. सरकारने विविध अर्थतज्ज्ञ आणि नामांकित संस्थांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी केला आहे.