वॉशिंग्टन - भारताच्या घसरलेल्या विकासदराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) चिंता व्यक्त केली आहे. कॉर्पोरेट आणि पर्यावरण नियामक संस्थांच्या अनिश्चिततेने भारतीय अर्थव्यवस्था घसररल्याचे निरीक्षण आयएमएफने नोंदविले आहे. ही माहिती आयएमएफचे संवाद संचालक गेर्री राईज यांनी पत्रकार परिषदेत दिली
दर पंधरा दिवसांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गॅर्री राईस यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा अपेक्षेहून कमी आहे. हे कॉर्पोरेट आणि पर्यावरण नियामक संस्थांमधील अनिश्चिततेमुळे घडत आहे. बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमुळे अर्थव्यवस्थेला धोका होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा चीनला इशारा ; अमेरिकेने आयात शुल्क वाढविल्यास विकासदर आणखी घसरणार
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५ टक्के जीडीपीची नोंद झाली. हे गेल्या सहा वर्षात सर्वात कमी प्रमाण आहे.
हेही वाचा-वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांतील देशापैकी भारतामधील तरुणाई सर्वात अधिक निष्क्रिय - आयएमएफ
भारतामधील तरुणाई निष्क्रिय-
लोकसभा निवडणुका पार पडत असताना सरकारची चिंता वाढविणारे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले होते. भारतामधील तरुणाई सर्वात अधिक निष्क्रिय ( बेरोजगारीचा अथवा शिक्षणाचा अभाव असल्याने सक्रियतेचा अभाव) असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ जॉन ब्ल्यूडॉर्न यांनी म्हटले होते.
हेही वाचा-जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारताची अर्थव्यवस्था - आयआयएमएफ